The applause, the clapping of hands, the lighting of the lamps did not go away, but increased; Jayant Patil slammed the BJP

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी मिशन मुंबईची घोषणा भाजपने केली आहे. यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षही तयारीला लागल्याचे दिसत आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढल्यावर भाजप निष्प्रभ होईल. महाविकास आघाडीसमोर भाजपला फारफार तर पन्नास जागा मिळतील असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

भाजपने काय करायचे  हा त्यांचा प्रश्न आहे.  मात्र, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर आमची ताकद खूप मोठी आहे. भाजपचा प्रभाव कमी होऊ शकतो.  हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून समोर आले असल्याचे वक्तव्यही जयंत पाटील यांनी केले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्र राहिलो तर भाजपला ३० किंवा ४० फारफार तर पन्नास जागा मिळू शकतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीकडून केल्या जाणार्‍या कार्यक्रमांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.