प्रेम करणे हा गुन्हा असेल तर रियाला तो भोगावा लागेल, वकिल सतीश मानशिंदे यांचे वक्तव्य

रिया चक्रवर्ती एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे आणि आता तिची चौकशी सुरू झाली आहे. रियावर सध्या चार जणांकडून विचारपूस केली जात आहे. यात एक महिला अधिकारी देखील आहे. यासोबतच रियाचे निवेदनही लिहिले आणि नोंदवले जात आहे.

मुंबई : सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. तपासादरम्यान अनेक नव्या नव्या घटना घडत आहेत. तसेच नवीन प्रकरणांचे उलघडे होत आहेत. सीबीआयच्या तपासादरम्यान ड्रग्ज बाबत काही पुरावे समोर आल्याने नारकोटीक कंट्रोल ब्युरोने रियाला समन्स बजावले आहेत. यावर रियाच्या वकिलांनी ट्विट करत रिया अटकेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. रिया एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, रिया चक्रवर्ती विच हंट म्हणून अटकेसाठी तयार आहे. एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल तर त्यांच्या प्रेमाचे फळ त्यांना आता भोगावे लागेल. सीबीआय, ईडी आणि एनसीबीसमवेत बिहार पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अद्याप कोणत्याही कोर्टाचे दार ठोठावले नाही. अशा आशयाचे ट्विट वकिलांनी केले आहे.

तसेच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला एनसीबीने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवाना केले आहे. रियाच्या भावासोबत सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना देखील पोलीस कोठडीत टाकले आहे.