मलेरिया, डेंग्यूच्या डासांनी नागरीकांना हैराण केले तर… गृहनिर्माण सोसायट्यांना BMC चा कडक इशारा

घरातील कुंडीमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. मलेरियासाठी लार्वा सोसायटी परिसरातील जमा झालेल्या पाण्यात होतो. दोन्ही मच्छर नाले, गटारातील पाण्यात नव्हे तर पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे पैदा होतात. काही दिवसांत मुंबईत मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे.

    मुंबई : गृहनिर्माण सोसायटी, दुकानांमध्ये जमा होणाऱ्या पाण्यावर डासांची पैदास होते आणि त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार बळावतात. जर एखाद्या सोसायटीत मलेरिया अथवा डेंग्यूमुळे कोणाचा मृत्यू होत असले तर सोसायटीवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. पालिकेने विभाग कार्यालयांनी यासंदर्भात गृहनिर्माण सोसायट्यांना नोटीसा देण्याचे काम सुरू केले आहे.

    घरातील कुंडीमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. मलेरियासाठी लार्वा सोसायटी परिसरातील जमा झालेल्या पाण्यात होतो. दोन्ही मच्छर नाले, गटारातील पाण्यात नव्हे तर पावसाळ्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे पैदा होतात. काही दिवसांत मुंबईत मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे.

    त्यामुळे पालिकेने सोसायट्यांना नोटीस धाडणे सुरू केले आहे. सोसायट्यांमध्ये मलेरिया, डेंग्यूच्या डासांवर नियंत्रण नाही आणले तर पालिका कायदा १८८८ च्या कलम ३८१ ‘बी’ अंतर्गत कारवाई करेल, असा इशारा दिला आहे. या कायद्यान्वये दहा हजार रुपये दंड वसुल करण्याशिवाय दररोज दोन हजार रुपये दंड वसुल करण्याची तरतूद आहे.