माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देतो; बहुजन कल्याणमंत्री वडेट्टीवारांचे ओपन चॅलेंज!

पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस नाही भाजपच जबाबदार आहे हे त्यांनी मान्य करावे. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचे त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. तत्कालीन सरकारने पाठवलेली ती सहा पत्र त्याचा पुरावा आहे,की भाजप ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळत आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

  मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्या आंदोलनांची हाक दिली आहे वडेट्टीवार यांनीही माध्यमांसमोर विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही करत वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो.

  भाजप ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळत आहे

  पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस नाही भाजपच जबाबदार आहे हे त्यांनी मान्य करावे. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचे त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. तत्कालीन सरकारने पाठवलेली ती सहा पत्र त्याचा पुरावा आहे,की भाजप ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळत आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

  केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी

  ओबीसींच्या आधी रिक्त असलेल्या जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. आम्हीही घोषणा केली आहे. हे करून उद्या जर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा प्रश्न निर्माण झाला तर तिथे ओबीसी प्रवर्गातीलच माणूस हवा. तुम्हाला ती जागा राखीव हवी तरच अध्यक्ष होईल. पण उद्या ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होणार आहे. आता या पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय आकांडतांडव सुरू आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यापलिकडे काही नाही. महाराष्ट्रातील जनता योग्य निर्णय घेईल. त्यावरून कळेल कुणाची चूक आहे, असा दावाही त्यांनी केला.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना