ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर… पंकजा मुंडेंचा इशारा

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुकी कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल. या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील.

    आरक्षण नसले तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाही. आज सरकारची मानसिकता दिसत नाही, त्यामुळे आम्ही आवाज उठवू. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.