लोकांनी तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री मान्य न करता आभासी मानलं तर, मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोपरखळी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा या वयातही राज्यभरात दौरे करत आहेत परंतु मुख्यमंत्री घरी बसुन आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यानी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, निवडणूक पूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे आता आभासी पद्धतीने बांधाव जात आहेत. उद्या लोकांनीच तुम्हाला जर प्रत्यक्ष मुख्यमंत्री न करता आभासी मुख्यमंत्री मानलं तर असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मुंबई : परतीच्या पावसाने (Rain) मागील काही दिवसांपासून राज्यात हाहाकार घातला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे (Heavy Rain) आतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे पुराचे (Flood) रुप निर्माण झाल्याने काढणीला आलेल्या पीकांचे प्रचंड (Farmers Loss) नुकसान झाला आहे. हवालदिल शेतकरी मदतीसाठी दया याचना करत आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजुनही घरात बसून आभासी दौरे करत आहेत. यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या पावसाचा जबर फटका बसला आहे. परंतु अश परिस्थितीत या भागांचा प्रत्यक्ष भेट देऊन दौरा केला पाहिजे. अशी मागणी विरोधक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच अधिकाऱ्यांशी चर्चा आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. परंतु आता प्रत्यक्ष दौरे करण्याची मागणीला विरोधकांनी जोर धरला आहे.