राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळत असेल तर… ! शिवसेनेच्या ”या” नेत्याने दिल्या शुभेच्छा

नारायण राणे यांना मंत्रिपद जर मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष यांच्या नेतृत्वात काम करतो असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व संपूर्ण जगाला माहित आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय,असं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

    मुंबई : केंद्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांना मंत्रीपद मिळण्याबाबत चर्चा सुरू आहेत. यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे. तोंडावर येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपा त्यांना संधी देईल अशी शक्यता वर्तवली जाते.

    दरम्यान नारायण राणे यांना मंत्रिपद जर मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेची कोंडी होऊ शकत नाही. शिवसेना पक्ष यांच्या नेतृत्वात काम करतो असे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व संपूर्ण जगाला माहित आहे. कोणी कितीही नाकारत असलं तरी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलंय,असं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

    राज्यातून मंत्रिपदासाठी चर्चेत कोणती नावे ?

    महाराष्ट्रातून नारायण राणे यांचं नाव आघाडीवर असून, यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे, गोपिनाथ मुंडेंच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे, भारती पवार आदी नावेही महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.