राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती : प्रविण दरेकर

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल,” अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

  दरम्यान अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी त्यांच्या सामनामधील रोखठोक या सदरामध्ये आज केले होते. त्याला दरेकरांनी उत्तर म्हणून भाष्य केलं आहे.

  मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला

  संजय राऊतांनी सामनामध्ये लिहलेल्या रोखठोक या सदरातील मजकुरावर दरेकरांनी चांगलीच टीका केली आहे. दरेकर यांनी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्थिर ठेवण्याचं काम केलं. तसेच लोकांसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं असं सांगितलं. “अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही. किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत,” असं प्रविण दरेकर म्हणाले.

  तर फुकचा सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

  पुढे बोलताना दरेकर यांनी राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असा खोचक टोला लगावला. तसेच मोदी यांनी देशाचा विकासदर जास्त ढासळू दिला नाही, असासुद्धा त्यांनी केला. “कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8% पर्यंत ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल,” असे दरेकर म्हणले. तसेच राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा आरोप दरेकर यांनी राऊतांवर केला.