teacher

पीएफमधून शिक्षक-शिक्षकेतरांना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, घराची दुरुस्ती तसेच गृहकर्ज फेडण्यासाठी परतावा वा ना परतावा रक्कम काढता येते. मात्र मार्चपासून बीडीएस बंद असल्याचे कारण देत पीएफची रक्कम देण्यास नकार देत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव पडून आहेत तर अनेक शिक्षक-शिक्षकेतर निवृत्त होऊन सहा महिने उलटले तरी त्यांच्या पीएफमधील अंतिम परतावा रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

    मुंबई: राज्यातील शिक्षक-शिक्षकेतरांना त्यांच्याच हक्काच्या भविष्य निर्वाह निधीमधील (पीएफ) रकमा काढू द्या अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा शिक्षक संघटनेकडून सरकारला देण्यात आला आहे.

    पीएफमधून शिक्षक-शिक्षकेतरांना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, घराची दुरुस्ती तसेच गृहकर्ज फेडण्यासाठी परतावा वा ना परतावा रक्कम काढता येते. मात्र मार्चपासून बीडीएस बंद असल्याचे कारण देत पीएफची रक्कम देण्यास नकार देत आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव पडून आहेत तर अनेक शिक्षक-शिक्षकेतर निवृत्त होऊन सहा महिने उलटले तरी त्यांच्या पीएफमधील अंतिम परतावा रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

    यासंदर्भात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांना निवेदन पाठवून शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शिक्षकांना हक्काचे पीएफचे पैसे मिळविण्यासाठी सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा बोरनारे यांनी दिला आहे.