aashish shelar

भूत आणि भूताटकी ही नेमकं कसली वक्तव्य आहेत? रोज नुसतं १२-१२ ची टिमकी वाजवली जातेय. तुमचे काय १२ वाजलेत का? भुतानं जर फाइल पळवल्याचं तुमचं म्हणणं असेल तर मी सांगू इच्छितो की भाजप काही करत नाहीय. पण भाजपनं जर एक डाव भुताचा टाकला तर तुम्हाला खूप भारी पडेल हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

    भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

    कोरोनाच्या काळात १२ आमदारांचा विषय कुठून आला? कोरोनाच्या पार्शवभूमीवर कोणत्याही निवडणुकीचं काम केलं तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जबाबदार. आज कोरोनाच्या काळात आणि बालकांच्याही चिंतेच्या काळात यांना १२ आमदारांची आठवण कशी येते? महाविकास आघाडी सरकारचं केवळ राजकारणावर लक्ष आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.