lockdown

मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार असून कोरोनाचे वाढते रूग्ण धोक्याची घंटा ठरत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.

    मुंबई : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार असून कोरोनाचे वाढते रूग्ण धोक्याची घंटा ठरत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.

    मुंबईत सर्वात आधी नाईट क्लब निर्बंध घालण्याची शक्यता आहे. मुंबईत लॉकडाऊन झाले तर सर्वात आधी नाईट क्लब बंद होणार आहेत. गर्दी असलेल्या ठिकाणी निर्बंध असल्याची शक्यता आहे. नाइट क्लबवर कारवाई सुरू केली आहे. जे हॉटेल्स मानक प्रणालींचे पालन करत नाहीत, ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना बसवतात अशांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे.

    अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन, निर्बंध यासारखे अनेक निर्णय घेतले जात असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगीतले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेश देले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी वाटलं, त्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावला जाईल तसेच संचारबंदी लावण्याची शक्यता आहे.