विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी सदनात मतदान झाल्यास आघाडीची सत्वपरिक्षा

भाजप सोबत ईडी प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या पक्षांचे संबंध ताणले गेले असताना या पदासाठी निवडणुक होवून मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी आपल्या सदस्यांना आणि सहयोगी पक्षांना पक्षादेश काढण्याचे  फर्मान सोडले असून प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर  आघाडीच्या आमदारांच्या मनात चलबिचल असल्याने भाजप कडूनही दबव तंत्र वापरले जाण्याचे मानले जात आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३,आणि काँग्रेस ४३ असे तीन पक्षाचे १५२ बहुमत आहे.

    मुंबई : राज्यात येत्या सप्ताहात होवू घातलेल्या राज्य विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडीची पुन्हा एकदा सत्व परिक्षा होण्याची शक्यता असून या वेळी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी सदनात मतदान घेण्याची वेळ येवू शकते असा होरा राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केला आहे. मागील काही वर्षापासून विधानसभा अध्यक्षांची निवड ही बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे.

    मात्र भाजपसोबत ईडी प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या पक्षांचे संबंध ताणले गेले असताना या पदासाठी निवडणुक होवून मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी आपल्या सदस्यांना आणि सहयोगी पक्षांना पक्षादेश काढण्याचे  फर्मान सोडले असून प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर  आघाडीच्या आमदारांच्या मनात चलबिचल असल्याने भाजप कडूनही दबव तंत्र वापरले जाण्याचे मानले जात आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३,आणि काँग्रेस ४३ असे तीन पक्षाचे १५२ बहुमत आहे.

    मात्र त्यात महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी – २ माकप शेकाप स्वाभिमानी पक्ष क्रांतिकारी शेतकरी पार्टी यांचा प्रत्येकी  १ सदस्य आहे त्यामुळे संख्याबळ १६३ होते. त्याशिवाय आठ अपक्षांना सोबत घेवून आघाडीकडे १७१ इतके संख्याबळ आहे. तर विरोधकांकडे भाजपचे १०६,जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष यांचे प्रत्येकी १ आणि पाच अपक्ष असे एकूण ११३चे संख्याबळ आहे. तर मनसे आणि एमआयएमचे २ असे एकूण ३ सदस्य  तटस्थ राहण्याची शक्यता आहे.