आज बाबा असते तर त्यांनी हेचं केलं असतं…; विलासराव देशमुखांचा जुना व्हिडीओ शेअर करत रितेशचा राजकारण्यांना सल्ला

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं दिसत आहे. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद आता शिगेला पोहोचलेला दिसतोय. शिवसेना नेते आणि राणे समर्थक वारंवार खालच्या थराचं वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावर आता मराठमोळा अभिनेता आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख याने विलासरावांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

  मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं दिसत आहे. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद आता शिगेला पोहोचलेला दिसतोय. शिवसेना नेते आणि राणे समर्थक वारंवार खालच्या थराचं वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यावर आता मराठमोळा अभिनेता आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख याने विलासरावांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

  दरम्यान त्यात विलासराव महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत आहेत. माझे स्वतःचे सर्वांशी प्रेमाचे संबंध आहेत. माझ्या विरुद्ध टीका करणाऱ्यांना मी तितक्याच प्रेमाने बोलत असतो. मी एका वेगळ्या संस्कृतीत वाढलो आहे. अनेकांना असं वाटतं की आपण रिएॅक्ट होत नाही. मी रिएॅक्शनरी नाही. मी अॅक्शन ओरिएंन्टेड आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी बोललं पाहिजे, असं विलासरावांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

  काही लोकांच्या कामाची स्टाईल वेगळी असते. काही अधिक आक्रमक असतात, ते लोकांना अधिक बरे वाटतात. माझा त्यावर अधिक विश्वास नाहीये. शांततेनं, संयमपणानं आपण राज्यकारभार केला पाहिजे आणि लोकांसोबत चांगलं पाहिजे, अशा संस्कृतीतून मी वाढलो आहे. माझी ट्रिटमेंट ही लाँग टर्म आहे. अॅलोपेथी नाहीये आयुर्वेदिक आहे, असंही विलासराव देशमुख या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)