girish mahajan

गिरीश महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे काल जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थि होते. याच कार्यक्रमादरम्यान गिरीश महाजन यांचा स्विय सहाय्यक दीपक तायडे यांना एक अज्ञात नंबर वरुन फोन आला आणी गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग नाहीतर त्यांना बॉम्बने उडवून देऊ. अशी धमकी देण्यात आली.

मुंबई : भाजप नेते ( leader of BJP) गिरीश महाजन यांना बॉम्बने ( bomb) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकटच खळबळ उडाली आहे. जामनेर येथे काल एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता. तसेच काल भाजपचे नेते ( leader of BJP) आशिष शेलार यांनाही धमकीचा ( threatening ) फोन आला होता.

गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्या जी.एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे काल जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थि होते. याच कार्यक्रमादरम्यान गिरीश महाजन यांचा स्विय सहाय्यक दीपक तायडे यांना एक अज्ञात नंबर वरुन फोन आला आणी गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग नाहीतर त्यांना बॉम्बने उडवून देऊ. अशी धमकी देण्यात आली. तसेच काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मेसेजही आला. याबाबतीत अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच काल भाजप नेते आशिष शेलार यांनाही दहा धमकीचे फोन आले होते. त्यांना धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी आज मुंब्र्यातुन अटक केली आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन आले होते. त्यांना धमकी देणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे.