राज्य सरकारवर टीका नको तर केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करा ; नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

विरोधी पक्षांनी केवळ राज्य सरकारवर टीका न करता केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राज्य सरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेऊन पंचनामे करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सुध्दा काही नुकसान ग्रस्त भागाचा दौरा केला त्याचा अंदाज पंचनाम्याच्या स्वरूपात येईल.

    मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते फक्त राज्य सरकारवर टीका करत आहेत. नुकसान ग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. जर फडणवीस यांनी असे केले तर ते महाराष्ट्रातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. पण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध झाले आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

    विरोधी पक्षांनी केवळ राज्य सरकारवर टीका न करता केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राज्य सरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेऊन पंचनामे करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सुध्दा काही नुकसान ग्रस्त भागाचा दौरा केला त्याचा अंदाज पंचनाम्याच्या स्वरूपात येईल. त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टॅंडिंग ऑर्डरपेक्षा अतिरिक्त मदत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न आहे. असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. चक्रीवादळानंतर मोदींनी गुजरात राज्याचा दौरा करून एक हजार कोटींचे पॅकेज सुध्दा जाहीर केले. पण मात्र मोदींनी महाराष्ट्राचा दौरा केला नाही. असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण होत आहे. विरोधीपक्षाने राज्य सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावे