If you have an account with HDFC Bank, transfer the money to another account now; RBI's major action on HDFC

बँकेचे डिजिटल व्यवहारही थांबवण्याचे निर्देश दिल्याने ऑनलाईन पैशांची देवाण घेवाण करताना किंवा इतर ऑनलाईन ट्रान्झीक्शन करताना खात्यात पैसे असूनही अडचणी येवू शकतात.

मुंबई : एचडीएफसीवर रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई केली आहे. यामुळे HDFC बँकेत अकाऊंट असलेल्यांना येत्या काळात डिजिटल व्यवहार करताना अडचणी येवू शकतात. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास मनाई केली आहे. बँकेचे डिजिटल व्यवहारही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.बँकेच्या इंटरनेट सेवा वारंवार डाऊन असल्याच्या तक्रारींची दखल घेत रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

याबाबत आलेल्या तक्रारीं नंतर आरबीआयने ही कारवाई केल्याचे समजते. सर्व कार्ये जबाबदारीने आणि योग्यप्रकारे होत असल्याची खात्री झाल्यावरच ही मनाई हटवण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.  बँकेचे डिजिटल व्यवहारही थांबवण्याचे निर्देश दिल्याने ऑनलाईन पैशांची देवाण घेवाण करताना किंवा इतर ऑनलाईन ट्रान्झीक्शन करताना खात्यात पैसे असूनही अडचणी येवू शकतात.

रिझर्व्ह बँकेच्या एचडीएफसीवरील कारवाईच्या वृत्तानंतर बँकेच्या शेअरही घसरले आहेत. शेअरचे भाव २५ रुपयांनी कमी होऊन १३८३ वर आले आहेत.

मागील दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या डिजिटल सेवा ठप्प होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या डिजिटल सेवा २१ आणि २२ नोव्हेंबरला अनेक तास ठप्प होत्या. त्याबाबत रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीकडे स्पष्टीकरण मागितले होते. ज्या केंद्रामध्ये समस्या आल्या, त्या केंद्रांची माहितीही रिझर्व्ह बँकेने मागवली होती.

एचडीएफसीच्या डेटा सेंटरमध्ये तांत्रिक समस्या असल्याने सुमारे १२ तास बँकेच्या युपीआय, एटीएम आणि डेबिट, क्रेडिट कार्ड सेवा पूर्णपणे ठप्प होत्या. बँकेच्या खातेधारकांना दोन वर्षात तिसऱ्यांदा या समस्येचा सामना करावा लागला होता. दोन वर्षात तिसऱ्यांदा अशी समस्या आल्याने रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त करत डिजिटल २.० अनुसार प्रस्तावित असलेले सर्व डिजिटल व्यवहार, आयटी अॅप्लिकेशन आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास मनाई केली आहे.