mumbai mall

मुंबई महानगरपालिकेनं(BMC) मॉल तसंच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी ॲन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल(corona negative report is compulsory to enter the mall) देणे बंधनकारक केले आहे. मुंबई मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं, की हे नवे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत.

    मुंबई: कोरोना रुग्णांची(corona patients in mumbai) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गुरुवारी २५८३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. हलगर्जीपणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं म्हणत प्रशासनाने नवे नियम लागू केले आहेत. आवश्यकता असल्याशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे.

    आता मुंबई महानगरपालिकेनं मॉल तसंच शॉपिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी ॲन्टिजन टेस्ट किंवा कोरोना निगेटिव्ह अहवाल देणे बंधनकारक केले आहे.((corona negative report is compulsory to enter the mall) मुंबई मनपा आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं, की हे नवे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत. शॉपिंग मॉलशिवाय मॉलमध्ये असणाऱ्या चित्रपटगृहांसाठीही हे नियम लागू असणार आहेत.

    काकाणी म्हणाले, तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत रुग्णवाढीसंदर्भात चर्चा झाली. आम्ही चाचण्यांचे प्रमाण वाढवत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाधित लोकांना ओळखणं आणि इतरांपासून दूर ठेवणं आवश्यक आहे.

    मध्यंतरीच्या काळात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोज नवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यातही मुंबईत विविध ठिकाणी होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन काय काय नियम बदलणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.