इंजिनिअर व्हायचय तर १२ वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची गरज नाही ; एआयसीटीई निर्णय

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणार्‍या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई: तुम्हाला इंजिनीअर व्हायचे असेल तर १२ वी पास होताना फिजीक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणे गरजेचे नाही. ही आनंदाची बातमी दिली आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(एआयसीटीई). त्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवे धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत आता बारावीच्या विद्यार्थ्याने हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे.

    तिन्ही विषय केले वैकल्पीक

    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नव्या धोरणानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत. त्यामुळे या विषयांचा अभ्यास कठीण जाणार्‍या विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    नवीन १४ विषयांची यादी जाहीर

    एआयसीटीई संस्थेने आता १४विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल.२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एआयसीटीई ने एक हँडबुक जारी केले असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.