तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे, मग हे काम आता सोपं होणार आहे, रेल्वेने केलाय अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार; क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पुणे येथून सुटणार्‍या पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २८.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

  मुंबई : मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोना काळात घरी परतणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना जाण्यासाठी अद्याप तिकिट उपलब्ध होऊ उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी ही नामी संधीच चालून आली आहे.

  १) 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
  01106 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  २) 01257 दादर- प्रयागराज छिवकी विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
  01258 प्रयागराज छिवकी- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ३) 01053 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
  01054 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (गुरुवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ४) 01109 लोकमान्य टिळक टर्मिनस – मंडुवाडीह विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि
  01110 मंडुवाडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (रविवार) दि. ९.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ५) 01423 पुणे- भागलपूर विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि
  01424 भागलपूर – पुणे विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ६) 01097 लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
  01098 दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ७) 01437 पुणे – लखनऊ विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
  01438 लखनऊ – पुणे विशेष (बुधवार) दि. १२.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ८) 01319 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंडुवाडीह विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
  01320 मंडुवाडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुध) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ९) 01457 पुणे-मंडुवाडीह विशेष (मंगळ) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
  01458 मंडुवाडीह -पुणे विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  १०) 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गोरखपूर विशेष (सहा दिवस – मंगळ वगळता) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
  01094 गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (सहा दिवस – गुरुवार वगळता) दि. १२.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  ११) 01189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर विशेष (दैनिक) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
  01190 दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दैनिक) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  १२) 01129 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गोरखपूर विशेष (मंगळ) दि. ४.५.२०२१पर्यंत आणि
  01130 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यामध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

  आरक्षणः

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पुणे येथून सुटणार्‍या पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २८.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

  या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.

  केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल असे रेल्वेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.