आयआयटी मुंबई देशात अव्वल

क्यूएस जागतिक रँकिंग स्पर्धेत पहिल्या २०० मध्ये तीन भारतीय विद्यापीठ मुंबई :विद्यापीठांची जागतिक क्रमवारी ठरवणाऱ्या क्यूएस जागतिक विद्यापीठ रँकिंग नुकतीच जाहीर झाले. यामध्ये

क्यूएस जागतिक रँकिंग स्पर्धेत पहिल्या २०० मध्ये तीन भारतीय विद्यापीठ 

 मुंबई : विद्यापीठांची जागतिक क्रमवारी ठरवणाऱ्या क्यूएस जागतिक विद्यापीठ रँकिंग  नुकतीच जाहीर झाले. यामध्ये आयटीआय मुंबईने देशात अव्वल होण्याचा मान मिळवला आहे.त्याखालोखाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आयआयटी दिल्लीने स्थान मिळवले आहे. मात्र पहिल्या १०० मध्ये देशातील एकाही विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेला स्थान मिळवता आले नाही. 

या तिन्ही संस्थाना २०० च्या यादीत स्थान मिळाले आहे. विद्यापीठाचा दर्जा, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची क्षमता, प्राध्यापकांची गुणवत्ता, प्राध्यापक – विद्यार्थी यांची गुणोत्तर, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण यावर क्यूएसतर्फे विद्यापीठाचा दर्जा ठरवून त्यांना क्रमवारी दिली जाते. जाहीर केलेल्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगळुरू आणि आयआयटी दिल्लीने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 

देशात अव्वल असलेल्या या तिन्ही संस्थांना जागतिक क्रमवारीत १५० मध्येही स्थान मिळवता आले नाही.आयआयटी मुंबईला ४६ गुण मिळाले असून, विद्यापीठाचा दर्जा ५०.४, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची क्षमता ७४.२,  प्राध्यापकांची गुणवत्ता ५३.१, प्राध्यापक – विद्यार्थी यांची गुणोत्तर ३६.२, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक ३.९, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी १.६ असे गुण मिळाले आहेत. हे गुण १०० पैकी देण्यात आले आहेत.

आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक पटकावला आहे, त्याखालोखाल इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगळुरू १८५ आणि आयआयटी दिल्लीने १९३ वा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या क्रमवारीत घट झाली आहे.

"आयआयटी मुंबईला देशातील अव्वल क्रमांक टिकवून ठेवण्यात यश आले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रमांक घसरला आहे. आम्ही आमच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहोत."

– प्रा. शुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई