सुपर मार्केट्समधील गर्दी कमी करण्यासाठी आयआयटीचे  नवीन ॲप

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी लोक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक भास्करन रामण आणि चेन्नई येथील गणित संस्थेचे

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी लोक दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक भास्करन रामण आणि चेन्नई येथील गणित संस्थेचे सुब्रमण्यम यांनी ‘स्मॉल बॅग’ नावाचे ॲप विकसित केले आहे.

लॉकडाउनच्या काळात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध सुपर मार्केट्स, मॉलमध्ये ग्राहकांना कूपन दिले जातात. मात्र त्यासाठी ग्राहकांना प्रथम कूपनसाठी आणि त्यानंतर खरेदीसाठी जावे लागते. यावर तोडगा म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांनी स्मॉल बॅग या ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यामातून सुपर मार्केटपासून ते किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत कोणीही जोडले जाऊ शकते व ग्राहकांना कूपन देऊ शकते. तसेच ऑनलाइन ऑर्डरही स्वीकारू शकतात.

 ही कूपन सेवा ग्राहकांना एसएमएस, ई-मेलद्वारेही उपलब्ध करून देता येऊ शकते.  ग्राहकांना टोकनचे स्टेटस लाइव्ह समजत असल्याने आपला नंबर किती वेळांनी येणार याची ग्राहकांना सहज माहिती मिळते. यामुळे ग्राहक, विक्रेते आणि सुपर मार्केट या सर्वांना उपयुक्त असे हे एप असल्याचे प्राध्यापक भास्करन यांनी सांगितले. या ॲपचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू असल्याचेही त्यांनी माहिती दिली.