कोकणात बेकायदेशीर बांधकाम, हवालामार्फत अरब देशात कोट्यावधींची गुंतवणूक; शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

२०१९मध्ये यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी सांपत्तीक स्थिती दाखविण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली आहे. तर जाधव कुटूंबियांच्या शेल कंपन्यातील हवाला व्यवहारांबाबत ईडीने हवाला प्रकरणी कारवाई करण्याबाबत पुराव्या निशी तक्रार केल्याचे ते म्हणाले. सोमैय्या म्हणाले की, प्रधान डिलर्स प्रा लि या बेनामी कंपनीव्दारे जाधव पतीपत्नीच्या कंपन्याना मिळालेले हवाला मधील पैसे त्यांनी संयुक्त अमिरात मध्ये गुंतवला.

    मुंबई : भाजपचे माजी खासदार डॉ किरिट सोमैय्या यांनी आज शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या कोकणात दापोली येथे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामा बाबत आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी केली. तर शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या आणि त्याचे पती य़शवंत जाधव यांच्या गेल्या दोन तीन वर्षातील बेनामी, बेहिशेबी व्यवहारांची चौकशी ईडी आय टी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला करण्याबाबत तक्रार केल्याची माहिती पत्रकारांना दिली.

    जाधव कुटूंबियांच्या शेल कंपन्या

    भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना सोमैय्या म्हणाले की, २०१९मध्ये यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी सांपत्तीक स्थिती दाखविण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली आहे. तर जाधव कुटूंबियांच्या शेल कंपन्यातील हवाला व्यवहारांबाबत ईडीने हवाला प्रकरणी कारवाई करण्याबाबत पुराव्या निशी तक्रार केल्याचे ते म्हणाले. सोमैय्या म्हणाले की, प्रधान डिलर्स प्रा लि या बेनामी कंपनीव्दारे जाधव पतीपत्नीच्या कंपन्याना मिळालेले हवाला मधील पैसे त्यांनी संयुक्त अमिरात मध्ये गुंतवला.

    हवालाव्दारे अमिरात मध्ये गुंतवणूक

    अरब अमिरात मध्ये आपल्या मुलांच्या कंपनीत गुंतवले असल्याचे दिसून  आले आहे. याबाबत या कंपन्यात हवाला व्यवहार झाल्याचे कंपनीचे मालक महावर यानी मान्य केल्याचे सोमैय्या म्हणाले. ते म्हणाले की, महावर यांचा हवाला व्यवहार करण्याचा व्यवसाय आहे आणि अन्य अनेक नेत्यांचे त्यांच्याशी व्यवहार झाले आहेत. या प्रकरणात महावर यांना जाधव कुटूंबियानी वेळोवेळी रोख रकमा दिल्या त्या त्यांनी शेल कंपन्यातून पुन्हा जाधव यांना परत दिल्या आहेत अशी कबुली दिली आहे. त्यामुळे या सा-या २०१८ ते २०२० दरम्यानच्या १५ ते २० कोटी रूपयांचा उगम काय होता आणि त्याचा हवाला व्यवहार कसा झाला याची चौकशी करण्यात यावी यासाठी कंपनी मंत्रालय ते ईडी, आयकर या विवीध विभागांना पत्र देण्यात आल्याचे सोमैय्या म्हणाले.