सॅटेलाईट ठेवणार मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर नजर,जीआयएस प्रणालीचा होणार वापर

मुंबईतील(Mumbai) अनधिकृत बांधकामांवर(Illegal Construction) आता सॅटेलाईटची(Satellite) नजर राहणार आहे. लवकरच ‘जीआयएस’(GIS) प्रणाली विकसीत केली जाणार आहे.

  मुंबई: मुंबईतील(Mumbai) अनधिकृत बांधकामांवर(Illegal Construction) आता सॅटेलाईटची(Satellite) नजर राहणार आहे. लवकरच ‘जीआयएस’(GIS) प्रणाली विकसीत केली जाणार आहे. या उपक्रमासाठी १० कोटी २८ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे. या प्रणालीमुळे बेकायदा बांधकामांना चाप लागणार आहे.

  मुंबईत झपाट्याने होणाऱ्या नागरी आणि औद्योगिक विकासात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे वाढली आहेत. या बांधकामांमुळे शहरांचे विद्रुपीकरण होते शिवाय नागरी सुविधांवरही मोठ्य़ा प्रमाणात ताण येतो. पालिकेकडून अशा बांधकामांवर कारवाई केली जाते, मात्र पुन्हा त्याच जाग्यावर बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे रोखण्य़ासाठी लवकरच सॅटेलाइट सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

  अत्याधुनिक पद्धतीने हा सर्व्हे केला जाणार आहे. यात आढळणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करता येणे सोपे जाणार आहे. यासाठी पालिका ‘जीआयएस’ (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रणाली विकसित करणार आहे. यासाठी १० कोटी २८ लाख रुपयांचा खर्च येणार असून निविदाही काढण्यात आली आहे.

  मुंबईत जमीन, जागेचे महत्त्व वाढल्याने जागोजागी बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. मात्र आता ‘जीआयएस’ तंत्रज्ञानामुळे पालिकेकडे सर्व बांधमाकांची नोंद राहणार आहे. ३६० अंशांत होणार्‍या अत्याधुनिक सर्वेक्षणात एका क्लिकवर बेकायदा बांधकामे, अतिक्रमणांची माहिती मिळणार आहे. या प्रणालीमुळे पालिकेला कारवाई करणे शक्य होणार आहे.

  खारफुटी, पर्यावरणाच्या संरक्षणास मदत
  मुंबईतील नदी, नाल्यावर तसेच खारफुटीच्या ठिकाणी भराव टाकून बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. हे प्रमाण निर्जन ठिकाणी वाढते आहे. त्यामुळे पालिकेचे ‘जीआयएस’ तंत्रज्ञानामुळे खारफुटीच्या संरक्षणास पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत होणार आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी दहिसरमध्येही असा प्रयोग रहिवाशांनी केला होता.