‘फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही’; भास्कर जाधवांचं भाजपच्या ”या” नेत्याला प्रत्युत्तर

भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात, अशी बोचरी टीका आमदार नितेश राणेंनी केली. त्यांच्या या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  मुंबई : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात, अशी बोचरी टीका आमदार नितेश राणेंनी केली.

  भास्कर जाधव काय म्हणाले?

  दरम्यान त्यांच्या या टीकेला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी फडतूस माणसांबद्दल बोलत नसतो, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर टीका केलीये. तसेच त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

  नितेश राणे काय म्हणाले होते?

  तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.

  दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे.