doctor

सीसीआयएमची अधिसूचना आणि त्याचे परिणाम भावी डॉक्टरांवर होणार असल्याचे इंडियन मेडिकल असाेसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या अधिसुचनेविरोधात आयएमए वैद्यकीय सेवा बंद आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे.

मुंबई : सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम)(CCIM) प्रकाशित केलेल्या राजपत्रात प्रकाशित केलेल्या अधिसूचनेविरूद्ध इंडियन मेडिकल असाेसिएशनने(IMA) आवाज उठवला आहे. सीसीआयएमची ही अधिसूचना आणि त्याचे परिणाम भावी डॉक्टरांवर होणार असल्याचे असाेसिएशनचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील ३६ शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे २०,००० वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश असणाऱ्या सीसीआयएम ही संघटना विद्यार्थी २ डिसेंबरपासून शांततामय निदर्शने करणार असल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील १५० सरकारी आणि खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्टरांची ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कही आंदोलन करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. याशिवाय या आंदोलनास महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स – मार्ड- यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

येत्या ८ डिसेंबरपासून या आंदोलनाला सुरूवात होणार असून सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक शहर आणि गावात सर्व आयएमए सदस्य शांततामय निदर्शने कणार असून ११ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात वैद्यकीय सेवा बंद करण्यात येणार आहेत. शुक्रवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान सर्व अत्यावश्यक नसलेल्या सेवा कोव्हीड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरु राहणार आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल आणि सर्व आयएमए राज्य शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये आणि काही स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमधील खटले दाखल करतील असा इशारा ही देण्यात आला आहे.

सीसीआयएमने २० नोव्हेंबर रोजी काढलेल्या सूचनेत एकूण ५८ शस्त्रक्रिया कार्यपद्धती, जनरल सर्जरी, युरॉलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑफ्थाल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) हाेणार नसल्याचे असाेसिएशनकडून सांगण्यात आले.