आयएमए आराेग्यसेवा बंदवर कायम! आज राज्यभरातील वैद्यकीय सेवा बंद राहणार

सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) डाॅक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून त्या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असाेिसएशनने विरोध केला आहे. ज्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंद मध्ये राज्यभरातील साधारण सव्वा लाख डाॅक्टर सहभागी हाेणार आहेत. शुक्रवारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक ऑपरेशन सेवा सुरु राहणार, परंतु इतर प्रा‌‌‌थमिक सेवा बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असाेिसएशनकडून सांगण्यात आले.

  • राज्यभरातील सव्वा लाख डाॅक्टर बंदमध्ये सहभागी
  • सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आराेग्य सेवा बंद

मुंबई (Mumbai). सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून (सीसीआयएम) डाॅक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केली असून त्या अधिसूचनेला इंडियन मेडिकल असाेिसएशनने विरोध केला आहे. ज्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. या बंद मध्ये राज्यभरातील साधारण सव्वा लाख डाॅक्टर सहभागी हाेणार आहेत. शुक्रवारी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक ऑपरेशन सेवा सुरु राहणार, परंतु इतर प्रा‌‌‌थमिक सेवा बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असाेिसएशनकडून सांगण्यात आले.

राज्यव्यापी पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे ४५ हजार डाॅक्टर, मार्ड, निवासी सर्जन असे राज्यभरातील एकूण सव्वा लाख डाॅक्टर या बंदमध्ये सहभागी हाेणार आहेत. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत आराेग्य सेवा बंद असणार आहे. यात दवाखाने, ओपीडी, क्लीनिक अशा प्रा‌‌थमिक सेवा बंद राहतील, तर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. या बंदमुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची काेणतीही गैरसाेय हाेणार नसल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भाेंडवे यांनी दिली आहे.