पक्ष्यांच्या पिसांवर साकारली गौतम बुद्धांची प्रतिमा

मुंबई : लॉकडाऊनमुळे नागरिकांना सण, उत्सव, जयंती घरातच साजरे करावे लागत आहे. यामुळे सोशल मीडिया आणि कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याच्या कल वाढला आहे. कलेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे

 मुंबई : लॉकडाऊनमुळे नागरिकांना सण, उत्सव, जयंती घरातच साजरे करावे लागत आहे. यामुळे सोशल मीडिया आणि कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याच्या कल वाढला आहे. कलेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश चौहान यांनी पक्ष्यांच्या पिसांवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा रेखाटत बुद्ध पौर्णिमेच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पक्ष्यांचे हवेत उडणारे पीस पाहून कवी मनाच्या व्यक्तीला कविता सुचतात. तर लहान मुले या पिसांच्या मागे धावत त्याला पकडण्याचा आनंद लुटत असतात. परंतु याच पिसांवर वेगवेगळे चित्र रेखाटल्यास त्याचे सौंदर्य अधिकच खुलते.

विक्रोळीतील अशाच एका कलाप्रेमीने पक्ष्याच्या पिसावर भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा साकारली आहे.  स्कार्लेट मकाऊ या जातीच्या पोपटाचे पीस घेऊन निलेश याने गौतम बुद्ध साकारले आहेत. ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्याला दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. कागद, लाकूड व अन्य वस्तूवर कोरीव काम करणारे अनेक आहेत. मात्र पक्ष्यांच्या पंखावर कोरीव काम करणारे देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यापैकी निलेश एक आहे. 

दोन महिने संचारबंदी असल्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडत आहे. यामुळे  शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांना आठवण करण्याची हीच खरी वेळ आहे. यामुळे ही कलाकृती साकारत लोकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा तसेच शांततेचा संदेश देत आहे, असे निलेश याने सांगितले.