medical education

सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्यात आले. महाभकास आघाडी सरकारने २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे, या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गोंधळावरून भाजपने मंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी याबाबत टिका ली आहे. त्यांनी म्हटले आहे की, टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करा.

    मुंबई : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्यात आले. महाभकास आघाडी सरकारने २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ करण्यात आला आहे, या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या गोंधळावरून भाजपने मंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी याबाबत टिका ली आहे. त्यांनी म्हटले आहे की, टोपे साहेब या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करा.

    आघाडी  सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’

    भाजप नेते भातखळकर यानी म्हटले आहे की, अर्थपूर्ण संवाद करत बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून गोंधळ निर्माण करायचा हाच महाविकास आघाडी  सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील लाखो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितले ते मिळालेच नाही. तर याहीवेळी अनेक परिक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत.

    टोपे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करा

    त्यामुळे आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या व आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.