खासगी शाळांना ५० टक्के शुल्क कमी करण्याबाबत तातडीने आदेश द्या

पालकांचा कळवळा आला म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार खासगी शाळांना शुल्क कमी करण्यास तेही १५ टक्के सांगण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आघाडी सरकारने आता विचार करणे थांबवून खासगी शाळांना १५ टक्के नव्हे तर ५० टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.

  • भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मागणी

मुंबई : खासगी शाळांना ५० टक्के शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारने तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पालकांचा कळवळा आला म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार खासगी शाळांना शुल्क कमी करण्यास तेही १५ टक्के सांगण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आघाडी सरकारने आता विचार करणे थांबवून खासगी शाळांना १५ टक्के नव्हे तर ५० टक्के शुल्क कमी करण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.

पालकांनी शुल्कवाढीविरोधात केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने नेहमीच पाठिंबा दिला आहे.या पुढेही आम्ही पालकांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असे भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Immediately order private schools to reduce fees by 50 percent says madhav bhandari

वाचकहो, तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.