रसनातर्फे इम्युनिटी बूस्टिंग कॉन्सन्ट्रेट्स बाजारात; क्रिकेटर रोहित शर्माला ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून नियुक्त करून रसना नवीन उत्पादनश्रेणीचे अभियान सुरू करणार

ही उत्पादने ग्लुकोज व फळांच्या एक्स्ट्रॅक्टद्वारे अधिक समृद्ध करण्यात आली असल्यामुळे तत्काळ ताजेपणा व ऊर्जाही पुरवतात. नागपूर ऑरेंज, अल्फान्सो मँगो, निंबुपानी, अमेरिकन पायनॅपल, शाहीगुलाब, कूल खस, केसर इलायची आणि कालाखट्टा मसाला या लोकप्रिय फ्लेवर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत.

    मुंबई : प्रत्येकाचा बालपणातील आवडता ब्रॅण्ड रसनाने अनन्यसाधारण इम्युनिटी बूस्टर्सने युक्त अशी नवीन कॉन्सन्ट्रेट्सची श्रेणी बाजारात आणत असल्याची घोषणा आज अभिमानाने केली. जगभरात सध्या कोरोनाविषाणूशी लढण्यासाठी “रोगप्रतिकारशक्ती तयार करण्याबद्दल” चर्चा सुरू असताना, रसना या मेक इन इंडिया तसेच आत्मनिर्भर ब्रॅण्डने प्रतिग्लास रुपये २/- एवढ्या किंमतीला हे फ्रुट बेस्ड इम्युनिटी ड्रिंक बाजारात आणून आघाडी घेतली आहे. रसनासाठी परवडण्याजोगी उत्पादने तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून देशाच्या दुर्गमातील दुर्गम भागामधील लहान मूलही मूलभूत गरजांपासून वंचित राहणार नाही.

    या नवीन उत्पादन श्रेणीमध्ये जीवनसत्त्व ई, बी१२, बी६, सेलेनिअम आणि झिंक या पाच महत्त्वाच्या इम्युनिटी बूस्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सातत्याने वाढत राहते. ही उत्पादने ग्लुकोज व फळांच्या एक्स्ट्रॅक्टद्वारे अधिक समृद्ध करण्यात आली असल्यामुळे तत्काळ ताजेपणा व ऊर्जाही पुरवतात. नागपूर ऑरेंज, अल्फान्सो मँगो, निंबुपानी, अमेरिकन पायनॅपल, शाहीगुलाब, कूल खस, केसर इलायची आणि कालाखट्टा मसाला या लोकप्रिय फ्लेवर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत.

    इम्युनिटी बूस्टिंग उत्पादनांच्या मागणीमध्ये सध्या खूपच वाढ झाली असल्याने, जागतिक बाजारपेठेतही प्रचंड वाढ झाली आहे. या उत्पादनांची बाजारपेठ वर्ष २०२५ पर्यंत १७ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल असे अपेक्षित आहे. या नवीन वर्गात ४०० दशलक्ष रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करून, जागतिक बाजारपेठेत २-३ टक्के वाटा प्राप्त करण्याच्या दिशेने रसना काम करत आहे. सध्या रसनाची उत्पादने भारतभरात उपलब्ध आहेत तसेच अन्य काही बाजारपेठांतही निर्यात केली जातात.

    रसना प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष खंबाटा या लाँचबद्दल म्हणाले, “पैशाचा पुरेपूर मोबदला देणारी तसेच इम्युनिटी वाढवणारी उत्पादने बाजारात आणणे रसनासाठी खूप अभिमानास्पद आहे. विशेषत: सध्या अशी उत्पादने काळाची गरज झाली आहेत. प्रत्येकासाठी रसना या तत्त्वावर रसनाचा विश्वास आहे आणि म्हणूनच गरिबातील गरीब लोकांना परवडण्याजोग्या फॉरमॅट्समध्ये ही उत्पादने बाजारात आणली गेली आहेत.

    जगभरात भारतीयांची मान अभिमानाने वर जाईल अशी कामगिरी करणारा भारताचा आवडता क्रिकेटपटू रोहित शर्मा याला रसनाने ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून नियुक्त केले आहे. रोहित शर्मा या इम्युनिटी/एनर्जी बूस्टिंग उत्पादनांना प्रमोट करणार आहे.