congress Farmers Bill

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी दिल्लीत मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सर्वांनी दिल्लीत तळ ठेकला आहे. पक्षात मराठा विरूध्द ओबीसी असे राजकारण तापल्याचे चित्र आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रीपद ठेवून प्रदेशाध्यक्षपद दिले तर ठीक अन्यथा मंत्रीपद सोडायला आपण तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांच्या जागी आता महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या संध्या सवालाखे यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे हे पद विदर्भाकडेच कायम राहिले. या नियुक्तीची घोषणा काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाळ यांनी केली.

सवालाखे या यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. गेल्याच महिन्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्याच आठवडयात राज्याचे प्रभारी एच. के.पाटील यांनी मुंबईत पक्षाचे आमदार आणि पदाधिकार्‍यांकडून नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत चाचपणी केली होती.

काँग्रेसचे नेते विजय विडेट्टीवार यांनी पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी देण्याची मागणी केली. आपण मंत्री असताना किंवा मंत्रीपद सोडून देवून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी पक्ष नेतृत्वाकडे सांगितले आहे. मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.