Important data missing from Mumbai Police Commissionerate; Verbal information of the police to the ATS

अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणाच्या एनआयए चौकशीत रोज नवे खुलासे होत आहेत. महाराष्ट्र एटीएस जेव्हा स्कॉर्पिओ चोरी प्रकरणाची चौकशी सुरू असताना मनसुखची चोरी झालेली स्कॉर्पिओ पोलिस मुख्यालयात उभी असल्याचे समजले होते. तपासा दरम्यान, एटीएस अधिकाऱ्यांनी फेब्रुवाती कोणकोणती वाहने आयुक्तालयात आली होती त्याची नोंद असलेल्या रजिस्टरची मागणी केली होती परंतु एटीएसला मात्र फेब्रुवारीचा रेकॉर्डच नसल्याचे तोंडी सांगण्यात आले होते.

    मुंबई : अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणाच्या एनआयए चौकशीत रोज नवे खुलासे होत आहेत. महाराष्ट्र एटीएस जेव्हा स्कॉर्पिओ चोरी प्रकरणाची चौकशी सुरू असताना मनसुखची चोरी झालेली स्कॉर्पिओ पोलिस मुख्यालयात उभी असल्याचे समजले होते. तपासा दरम्यान, एटीएस अधिकाऱ्यांनी फेब्रुवाती कोणकोणती वाहने आयुक्तालयात आली होती त्याची नोंद असलेल्या रजिस्टरची मागणी केली होती परंतु एटीएसला मात्र फेब्रुवारीचा रेकॉर्डच नसल्याचे तोंडी सांगण्यात आले होते.

    आयुक्तालयात येणाऱ्या वाहनांची नोंद असलेले रजिस्टर गायब होतेच कसे असा धक्कादायक प्रश्नही उपस्थित झाला. यामागे संगनमत असल्याचा एटीएसला संशय आहे.

    एटीएसने आयुक्तालयाला याबाबत लेखी विचारणा केल्यानंतरही आयुक्तालयाने कोणतेच उत्तर दिलेले नाही. दरम्यान हा संपूर्ण घटनाक्रम एटीएसने नोंदविला असून यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

    मुंबई पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक प्रवेश मार्गावर एक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी तैनात असतो. फेब्रवारी महिन्यात एटीएस येथे वाहनांच्या नोंदींची तपासणी करीत होते त्यावेळी पोलिस निरीक्षकाने आपली व्यक्तिगत डायरी दाखविली होती त्यात दिवसभरातील कामकाजाच्या नोंदी होत्या.