corona

याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील निवासी इमारतींमध्ये वाहनचालक, सुरक्षरक्षक, सफाई कामगार यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. महापालिकेने अनेक विभागांमध्ये फिरते दवाखाने सुरु केले आहेत.

  • महापालिकेने कोरोना चाचणी केली बंधनकारक

मुंबई : राज्यात लॉकडाऊन (Lockdown) शिथिल झाल्यानंतर अनेक इमारतींमध्ये घरकाम करणारे, वाहनचालक कामगारांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे मोठ्या इमारतींमध्ये बाधित रुग्णांचे (Corona Patient) प्रमाणही आता वाढत असल्याने यापुढे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, वाहनचालक या सर्वांची कोरोना चाचणी (corona test) करुन घेणे मुंबई महापालिकेने सर्व निवासी इमारतींना बंधनकारक केले आहे.


याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील निवासी इमारतींमध्ये वाहनचालक, सुरक्षरक्षक, सफाई कामगार यांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. महापालिकेने अनेक विभागांमध्ये फिरते दवाखाने सुरु केले आहेत. तिथे या कर्मचाऱ्यांची आरोग्यतपासणी करता येईल. याची जबाबदारी निवासी इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायची असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पालिकेची मोबाइल व्हॅनही प्रत्येक परिमंडळात फिरून रुग्णांना शोधत आहे. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढवून १८ ते २० हजारपर्यंत नेण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यानुसार, सर्व सहायक आयुक्तांना नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.