अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाने पूरग्रस्तांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाने पूरग्रस्तांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 3, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.