Important evidence found in a black Mercedes trunk; Hiren's last journey in the same car

एनआयएने जप्त केलेले काळ्या रंगाची मर्सिडीज कार ही कोणाची अशी चर्चा आता सुरु झाली आहे. या कारच्या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या कार्यालयात एनआयएने झाडाझडती घेतली. या झाडाझडती दरम्यान सचिन वाझेंच्या कार्यालयातून मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्रे एनआयएने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या छाप्याची मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नव्हती, असे समजते.

  मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात दररोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. एनआयएने मंगळवारी या प्रकरणी ठाणे आणि मुंबईत छापेमारी केली. या कारवाईत एनआयएच्या हाती संशयित काळ्या मर्सिडिज लागली आहे.

  एनआयएने जप्त केलेले काळ्या रंगाची मर्सिडीज कार ही कोणाची अशी चर्चा आता सुरु झाली आहे. या कारच्या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या कार्यालयात एनआयएने झाडाझडती घेतली. या झाडाझडती दरम्यान सचिन वाझेंच्या कार्यालयातून मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्रे एनआयएने जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या छाप्याची मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नव्हती, असे समजते.

  एनआयएने स्कॉर्पिओ प्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी रियाझ काझीला अटक केली आहे. एनआएच्या चौकशीत खळबळजनक माहिती त्यांनी दिली असल्याचे समजते. तसेच मंगळवारी एनआयएला आणखी महत्त्वाचे धागेदारे सापडले आहेत. स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्याप्रकरणी एनआयएला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

  स्कॉर्पिओ आण्िा इनोव्हा कार जप्त केल्यानंतर एनआयएने एक मर्सिडिज हस्तगत केली आहे. या गाडीच्या पंचनाम्यातून महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण षडयंत्रात इनोव्हा, स्कॉर्पिओप्रमाणेच मर्सिडिजचाही वापर करण्यात आला होता, अशी सुत्रांची माहिती आहे. मंगळवारी एनआयएच्या काही पथकांनी वाझेंनी दिलेल्या कबुलीनुसार मुंबई आणि ठाण्यातील विविध ठिकाणांवर धाड मारली. येथून महत्त्वाचे पुरावे गोळा गेल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

  एनआयएने इनोव्हा कार हस्तगत केल्यानंतर अंबानीच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी खुलासे झाले हाेते. एनआयएच्या तपासात इनोव्हा कारला सीआययूचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएकडे महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. अंबानीच्या घराबाहेर आढळलेली स्कॉर्पिओ आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेनची हत्या, यांचा परस्पर संबंध असल्याचे यावरून समजत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

  एनआएला अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करणे आणि गाडीच्या मालकाची हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचे होते. या फुटेजमध्ये मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. काही वेळाने मर्सिडिज आली आणि ते या गाडीत बसून तेथून निघून गेले. हे सीसीटीव्ही फुटेज ४ मार्चचे आहे, ज्या दिवशी मनसुख हिरेन बेपत्ता झाले होते. ५ मार्चला त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळला होता.