raj thackeray

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे मोठी हालचाल पहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे पक्षात मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे नेते आणि तब्बल ५० पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी तातडीने ही बैठक घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनीही कंबर कसली आहे. त्यातच मनसेही आता निवडणुकीच्या तयारीला लागल्याची कुजबुज या निमित्ताने सुरु झाली आहे.