मुंबईत पाणीपुरवठा विभागाचे महत्वाचे काम; कुर्ला आणि घाटकोपरमध्ये १० टक्के पाणी कपात

मुंबई शहर,पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महानगर पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे.

    मुंबई : पालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामासाठी गुरुवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरता हे उदंचन केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत पश्चिम उपनगरे, शहर भागातील दादर माटुंगा वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील कुर्ला आणि घाटकोपर विभागात होणाऱ्या पाणीपुरवठयात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

    मुंबई शहर,पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महानगर पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्र हे गुरुवार दि. २६ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपासून शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरता बंद ठेवण्यात येणार आहे.

    परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये सुमारे १० टक्के पाणी कपात होणार आहे. या कालावधीत भांडुप संकुलद्वारे होणाऱ्या पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील परळ माटुंगा वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगराला कुर्ला आणि घाटकोपर विभागात होणाऱ्या पाणीपुरवठयात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

    या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा.तसेच, पाणी कपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]