राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

मुकेश अंबानींचे घर उडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे. यामागे कोणाचा हात आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे, तर नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीचं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहीलं आहे. आणि आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही आक्रमक झाले आहेत.

    मुकेश अंबानींचे घर उडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे. यामागे कोणाचा हात आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती लागू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

    वाझे सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा शिवसेना आणि राज्य सरकारचा प्रयत्न चुकीचा होता. वाझे हे शिवसेनेत राहिलेले आहेत. सचिन वाझे यांचे गॉडफादर कोण हे शोधले पाहिजे. या प्रकरणाचा लवकर महाराष्ट्रात उलगडा झाला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मगणी रामदास आठवले यांनी केली आहे.