The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असला तरी अद्यापही मुंबईतील अनेक शाळांचे निर्जंतुकीकरण व साफसफाई झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांचे सॅनिटाईटज, त्यांचे ऑक्सिजन, तापमान मोजणे, मास्क यासारख्या बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र अवघ्या चार दिवसांमध्ये शाळा सफाई करून त्यांचे निर्जंतुकीकरण करणे अशक्य आहे. तसेच पालिकेकडून सॅनिटायझर, ऑक्सिमीटर आणि थर्मल मशीनही पुरवल्या नसल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड मुख्याध्यापकांवर खिशावर पडत असल्याने पालिका शाळेतील मुख्याध्यापकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  मुंबई: शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असला तरी अद्यापही मुंबईतील अनेक शाळांचे निर्जंतुकीकरण व साफसफाई झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांचे सॅनिटाईटज, त्यांचे ऑक्सिजन, तापमान मोजणे, मास्क यासारख्या बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. मात्र अवघ्या चार दिवसांमध्ये शाळा सफाई करून त्यांचे निर्जंतुकीकरण करणे अशक्य आहे. तसेच पालिकेकडून सॅनिटायझर, ऑक्सिमीटर आणि थर्मल मशीनही पुरवल्या नसल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड मुख्याध्यापकांवर खिशावर पडत असल्याने पालिका शाळेतील मुख्याध्यापकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास २९ सप्टेंबरला मंजुरी दिली. त्यानुसार पालिकेच्या प्रत्येक विभागातील सहाय्यक अधिकाऱ्यांनी तातडीने विभागातील शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना शाळांची साफसफाई व निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या सूचना देताना साफसफाई, निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक खर्चाचा बोजा मुख्याध्यपाकांवर टाकत आपली जबाबदारी झटकली. चार दिवसांमध्ये शाळांची सफाई व निर्जंतुकीकरण करणे शक्य नसल्याचे मुख्याध्यापकांनी केलेल्या सूचनेकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.

  दिवाळीच्या एक महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा साफसफाई करण्यासाठी किमान चार दिवस लागतात. कोरोनामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळेच्या इमारतीची साफसफाईबरोबरच निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. त्यातच प्रत्येक शाळेमध्ये एक किंवा दोन सफाई कामगार आहेत. काही शाळांमध्ये महिला सफाई कामगार आहेत. त्यांच्याकडून चार दिवसांत शाळेची सफाई होणे शक्य नसल्याचे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येत आहे.

  काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी पैसे देऊन बाहेरून नाका कामगार आणून त्यांच्याकडून शाळांची सफाई व निर्जंतुकीकरण केले. शाळा निर्जंतुकीकरणासाठी लागणारे सॅनिटायजर, थर्मल मशीन, ऑक्सिमीटर हे सुद्धा मुख्याध्यापकांना स्वखर्चाने विकत आणावे लागले आहे. शाळेची साफसफाई, निर्जंतुकीकरण, थर्मल मशीन, ऑक्सिमीटर यासाठीचा भुर्दंड हा मुख्याध्यापकांवर पडला आहे.

  काही शाळांमधील शिक्षकांनी पैसे काढून हा खर्च केला आहे. त्यातच गांधी जयंती व रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी असल्याने शाळांची सफाई करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या हातात राहिल्याने त्यांना शाळा साफसफाई करणे शक्य झाले नाही. परिणामी शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असतानाही अद्यापही अनेक शाळांचे निर्जंतुकीकरण झाले नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात पालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना वारंवार दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात येत असल्यातरी शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारनेही हात वर करून संपूर्ण जबाबदारी शाळांवर ढकलली आहे. प्रत्येक शाळेत आरोग्य क्लिनिक सुरू करावे, पंखे, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामिटर, औषधे, मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शाळांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शिक्षकांनी शाळा सुरू झाल्यावर मुलांना शिकवावे की निधी मागण्यासाठी दारोदार फिरावे ? असा प्रश्न भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला.