दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य ; रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला

मुंबई: महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेने फेटाळला आहे. महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.

मुंबई: महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडण्याचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेने फेटाळला आहे. महिलांसाठी दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. कोरोनाच्या आधी पश्चिम रेल्वेवर दररोज ३५ लाख प्रवासी प्रवास करायचे. मात्र आता एका लोकलमध्ये ७०० प्रवाशी दिवसाला प्रवास करत असून दिवसाला एकूण ९.६ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा लागेल. पश्चिम बंगाल राज्यसरकारने ज्या पद्धतीने लोकल आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक उपायांसाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.