लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून नाही : संदीप देशपांडे

मुंबई लोकल (Mumbai local) सुरु करा या मागणीसाठी मनसे काल सोमवारी रस्त्यावर उतरली होती. यावेळी मनसेकडून (MNS) सविनय कायदेभंग करत विनापरवाना लोकलमधून प्रवास करण्यात आला. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) , माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) , गजानन काळे (Gajanan Kale) , अतुल भगत (Atul Bhagat)  या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला होता.

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai local) सुरु करा या मागणीसाठी मनसे काल सोमवारी रस्त्यावर उतरली होती. यावेळी मनसेकडून (MNS) सविनय कायदेभंग करत विनापरवाना लोकलमधून प्रवास करण्यात आला. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) , माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri) , गजानन काळे (Gajanan Kale) , अतुल भगत (Atul Bhagat)  या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला होता. यामुळे या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर लोकशाहीत चर्चा करुन मार्ग काढले जातात, डोक्यावर बंदुका ठेवून मार्ग काढले जात नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

पुढे संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला अजून अटक झालेली नाही. आम्ही स्वत: पोलिसांना शरण जात आहोत. प्रवास केला म्हणून अटक होते ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असावी, अन्यथा दंड देऊन सोडलं जातं. सरकारचा किती आकस आहे, हे यातून दिसून येतं.

कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या नेत्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं बोललं जातं आहे. आज २२ सप्टेंबरला कल्याण रेल्वे कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, विना तिकीट प्रवास तसंच रेल्वे अधिनियम कलम १४७, १५३, १५६ अन्वये कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.