येथे पनीरमध्ये दुधाऐवजी होतोय तेलाचा वापर; FDAने कारवाई करत केलंय ‘एवढ्या’ किलोचं पनीर जप्त, वाचून बसेल धक्का

२५० किलो पनीर जप्त करत ते नष्ट करण्यात आले. या पनीरची किंमत ४६ हजार रुपये इतकी आहे. या पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

  मुंबई : खवा-मावा, दूध, तूप तसेच पाकिटबंद लोणी यांत भेसळ होण्याचे प्रकार उघड येत असतानाच मुंबईत पनीरमध्येही भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. पनीरच्या विक्रीतून नफा वाढवण्यासाठी दुधाऐवजी खाद्यतेलाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील जीटीबी नगर आणि भिवंडीतील उत्पादक कंपनीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुमारे २३५० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले.

  एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार जीटीबीनगरमधील एका दुग्धालयात छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान जप्त करण्यात आलेल्या पनीरमध्ये दुधाऐवजी खाद्यतेल वापरण्यात आल्याचे उघडकीस आले. दुधापासूनच पनीर बनवले जात असताना त्यात खाद्यतेल वापरून अन्न सुरक्षा कायद्याचा भंग केला जात असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानुसार २५० किलो पनीर जप्त करत ते नष्ट करण्यात आले.

  या पनीरची किंमत ४६ हजार रुपये इतकी आहे. या पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. केकरे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक आयुक्त बी. डी. मुळे आणि अन्न निरीक्षक एल. एस. साळवे, तात्या लोखंडे यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.

  मुंबईत जप्त करत नष्ट करण्यात आलेले पनीर भिंवडीतील एका गावातील उत्पादक कंपनीकडून खरेदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ठाणे विभागाला पुढील कारवाईसंदर्भात कळवण्यात आले होते. या अनुषंगाने ठाणे विभागाने या कंपनीवर छापा टाकत २१०० किलो पनीर जप्त केले आहे. तर याची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपये असून हे पनीर नष्ट करण्यात आले आहे. पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

  in cheese paneer use oil instead of milk know the full story details

  वाचकहो तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.