bmc

कोरोना(corona) महामारी काळात अनधिकृत बांधकामाना(illegal construction)चांगलीच चालना मिळाली आहे. यात २५ मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ९५५८ अनधिकृत बांधकाम उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर येत आहे.

  मुंबई : कोरोना(corona) महामारी काळात अनधिकृत बांधकामाना(illegal construction)चांगलीच चालना मिळाली आहे. यात २५ मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत ९५५८ अनधिकृत बांधकाम उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर येत आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अतिक्रमण व निर्मुलन शहरे कार्यालयकडे ऑनलाईन प्रणालीवर अवैध बांधकामबाबत तक्रारची विचारणा केली होती.

  त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २५ मार्च २०२० पासून २८ फेबुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर एकूण १३३२५ तक्रार नोंद झाली आहे. त्यात ३७६७ दुबार तक्रार नोंद आहे. ९५५८ अनधिकृत बांधकाम करण्यात आली. यात ४६६ अनधिकृत बांधकामावर निष्कासन कार्यवाई झाली आहे. सर्वात जास्त एकूण ३२५१ तक्रार एल विभागात नोंद झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना सहाय्यक अभियंता (अति.नि.) शहरे यांनी दिली आहे.

  पालिका वाॅर्डनिहाय तक्रारी; कारवाई कधी?-आरटीआय कार्यकर्ते सवाल
  ए विभागात एकूण ३२ तक्रार, बी विभागात एकूण ३६८ तक्रार, सी विभागात एकूण ६१४ तक्रार, डी विभागात एकूण १५१ तक्रार, ई विभागात एकूण ५७९ तक्रार, एफ नॉर्थ विभागात एकूण १४८ तक्रार, एफ साऊथ – २९७ तक्रार, जी नॉर्थ – २०३ तक्रार, जी साऊथ – २१२ तक्रार, एच पूर्व- ४५१, एच पश्चिम- ५२५, के पूर्व – ४४१ तक्रार, के पश्चिम – ३४२ तक्रार, एल विभागात सर्वाधिक म्हणजे ३२५१, एम पूर्व विभागात ११९४ तक्रार, एम पश्चिम – १२१३ तक्रार, एन – २८० तक्रार, पी नॉर्थ -४२९, पी साऊथ – ४१६ तक्रार, आर नॉर्थ -५९५, आर साऊथ -३४८ तक्रार, आर सेंट्रल विभागात एकूण ३९८ तक्रार, एस विभागात एकूण ५८९ तक्रार, टी विभागात एकूण २४९ तक्रार करण्यात आल्या. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबईत लाखो अनधिकृत बांधकामावर कार्यवाही कधी करणार असा सवाल उपस्थित केला आहे.

  सर्वाधिक तक्रारी असलेला विभाग आणि तक्रारी
  एल विभाग – ३२५१ तक्रारी
  एम पूर्व – ११९४ तक्रारी
  एम पश्चिम- १२१३ तक्रारी
  आर नाॅर्थ – ५९५ तक्रारी
  ई विभाग – ५७९ तक्रारी
  एच विभाग – ५२५ तक्रारी
  एस विभाग- ५८९ तक्रारी

  सर्वात कमी तक्रारी असलेला विभाग – ए विभाग – ३२ तक्रारी