girl fire herself

ही भीषण घटना ७ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात घडली आहे. येथील अतरैला गावात पीडिता आपल्या घरात एकटीच होती. तिचे कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले होते तर मोठी बहीण बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. दुपारी ४ च्या सुमाराला एक १५ वर्षांचा मुलगा तिच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

मध्यप्रदेश : हाथरसमधील बलात्कार प्रकरणाची आग देशवासीयांच्या मनात धगघगत असतानाच देशात अनेक बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. मध्य प्रदेशमध्येही (Madhya Pradesh) असाच प्रकार घडला असून बलात्कारामुळे (a minor girl was raped)  मानसिक धक्का बसलेल्या मुलीने स्वतःला जाळून (herself on fire) घेतलं आहे.

ही भीषण घटना ७ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात घडली आहे. येथील अतरैला गावात पीडिता आपल्या घरात एकटीच होती. तिचे कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले होते तर मोठी बहीण बकऱ्यांना चरायला घेऊन गेली होती. दुपारी ४ च्या सुमाराला एक १५ वर्षांचा मुलगा तिच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

या अत्याचारामुळे व्यथित झालेल्या पीडितेने त्याच्यासमोरच रॉकेल टाकून स्वतःला पेटवलं. तिचं पूर्ण शरीर पेटलेलं पाहून आरोपीची भीतीने गाळण उडाली आणि त्याने आग विझवायचा प्रयत्न केला. मात्र, आग विझली नाही. (victim committed suicide) त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने तिथून पळ काढला. संध्याकाळी तिचे कुटुंबीय परतले तेव्हा त्यांना पीडिता घरातच होरपळलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केलं.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांना या दोघांचे प्रेमसंबंध असावेत असा संशय आहे. अद्याप पीडितेचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहे. तो आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.