महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चर्चेत आले ते ठाकरे सरकारशी घेतलेल्या पंग्यामुळे. १२ आमदारांची यादी असो को विमान प्रवेश कोश्यारी नेहमीच वादात राहिले. आता कोश्यारी यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने येथील राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चर्चेत आले ते ठाकरे सरकारशी घेतलेल्या पंग्यामुळे. १२ आमदारांची यादी असो को विमान प्रवेश कोश्यारी नेहमीच वादात राहिले. आता कोश्यारी यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे.
  त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने येथील राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नावदेखील उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. कोश्यारी यांनी याआधी देखील उत्तराखंडचं नेतृत्त्व केलं आहे. यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

  भाजप नेतृत्त्वानं उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कोणाचंही नाव निश्चित केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका सुरु आहेत.

  भगतसिंह कोश्यारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक मानले जातात. संघाच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजाचादेखील अनुभव आहे. उत्तराखंडमधील भाजपचे कार्यकर्ते आणि महत्त्वाचे नेते यांच्याशी त्यांचा आजही थेट संबंध आणि संपर्क आहे. राज्याचं नेतृत्त्व करण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.

  मात्र, त्यांच वय त्यांच्या विरोधात जाऊ शकतं. कोश्यारी यांचं वय ७८ वर्षे आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.