मुंबईत कोरोनाचे १०६६ नवे रुग्ण, तर ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईमध्ये सोमवारी १०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २२४८ वर पोहचला आहे.

 मुंबई :मुंबईमध्ये सोमवारी १०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २२४८ वर पोहचला आहे.   मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील आठवड्यात सातत्याने वाढ होत असल्याचे समोर आले. परंतु सोमवारी आठवडयाच्या सुरुवातीला रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे.  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत.

सोमवारी मुंबईमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३९  जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २५ जण हे ६० वर्षांवरील, तर ३० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.  मुंबईत कोरोनाचे ७०९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४२ हजार २४३ वर पोहचली आहे. तसेच ३१३९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३० हजार १२५ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.