मुंबईत कोरोनाचे १५१० नवे रुग्ण आढळले, दोन दिवसांत रुग्ण संख्येत वाढ

मुंबई : मुंबईत शनिवारी ५४ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढ

  मुंबई : मुंबईत शनिवारी ५४ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत  मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे, आठवडयाच्या सुरुवातीला रुग्ण संख्येत घसरण झाल्याचे समोर आले होते. वाढती रुग्ण संख्यावर नियंत्रण मिळविण्याबाबत पालिका आरोग्य विभागाच्या पदरी निराशाच येत आहे. शनिवारी  मुंबईमध्ये १५१० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३८ हजार २२० वर पोहचली आहे.

 त्याचप्रमाणे ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२२७ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या ५४ पैकी १४ मॄत्यु २५ ते २८ मे दम्यानचे आहेत. तर मॄत रुग्णापैकी ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३१ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे. २८ जण हे ६० वर्षांवरील, तर २६ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते, अशी माहिती पालिका साथ रोग कक्षाकडून देण्यात आली. मुंबईत कोरोनाचे ८३२  संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ३८६  वर पोहचली आहे.  तसेच ७१५  रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १६, ००८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.