मुंबईत कोरोनाबधितांनी ओलांडला २० हजारांचा टप्पा

मुंबईत ११८५ नवे रुग्ण ;२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई :मुंबईत सोमवारी ११८६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार १५२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २३ जणांचा कोरोनामुळे

मुंबईत ११८५ नवे रुग्ण  ;२३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवारी ११८६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार १५२ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७५७ वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून सोमवारीही मुंबईमध्ये तब्बल ११८६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २१ हजार १५२ वर पोहचली आहे.

१२ ते १६ मे दरम्यान केलेल्या ३०० चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. मुंबईमध्ये २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७५७ वर पोचली आहे.मृत्यू झालेल्या २३ जणांमधील १३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १८ पुरुष तर ५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखालील, ११ जण हे ६० वर्षांवरील, तर ९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८०४ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २० हजार १५४ वर पोहचली आहे. तसेच ५०४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ५५१६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.