मुंबईत दिवसभरात फक्त एका १ काेराेना रुग्णाचा मृत्यु; राज्यभरात काय आहे परिस्थिती? रुग्णसंख्या वाढीची आकडा किती? जाणून घ्या

मुंबईत दिवसभरात २७२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४१६६१ एवढी झाली आहे. तर १ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९५२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मुंबई: राज्यात मंगळवारी ४,३५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,३२,६४९ झाली आहे. आज ४,२४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,४३,०३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४९,७५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात मंगळवारी ११९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२६,३२,८१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,३२,६४९ (१२.२२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०१,९५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]