rashmi shukla

राज्याच्या माजी गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला(rashmi shukla) यांना गोपनियता आणि शिस्तभंग तसेच अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीसांनी(mumbai cyber police) दुसऱ्यांदा समन्स(second summons to rashmi shukla) बजावले आहे.

    मुंबई : राज्याच्या माजी गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला(rashmi shukla) यांना गोपनियता आणि शिस्तभंग तसेच अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलीसांनी(mumbai cyber police) दुसऱ्यांदा समन्स(second summons to rashmi shukla) बजावले आहे.

    यापूर्वी त्यांना २८ तारखेला हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर शुक्ला यांनी कोविड-१९ स्थितीत कर्तव्यावर असल्याने मुंबईत येण्यास नकार कळविला होता. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवून घेता आला नसल्याने त्यांना नव्याने समन्स काढण्यात आले आहे. त्यांना आता ३ मेपर्यंत हजर राहण्याचे आदेशित करण्यात आल्याची माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी दिली.

    शुक्ला यांच्यावर आरोप आहे की त्यांनी कथित परवानगी विना फोन टॅपिंग केले. त्यानंतर या प्रकरणात त्यांनी माफी मागितली होती. मात्र या प्रकरणाचा अहवाल उघड झाल्याप्रकरणी त्यांच्यावर मुख्यसचिवांनी गोपनियता भंगाचा गुन्हा दाखल करून चौकशीची शिफारस केली होती.

    सीबीआयकडून रश्मी शुक्लांचा जबाब नोंद
    दरम्यान शुक्ला यांनी राज्य सरकारला जबाब नोंदविण्यास नकार दिला असला तरी   २१ एप्रिल रोजी हैदराबाद येथे अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याचे सांगण्यात येत आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआयने शुक्ला यांना साक्षीदार केल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला.

    सीबीआयने नोंदविले अनेकांचे जबाब
    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यात २१ एप्रिलला रश्मी शुक्ला यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवल्याचे सांगण्यात येत आहे.

    महाराष्ट्र केडरच्या सनदी अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती त्यांनी समन्स बजावल्यानंतर मुंबई पोलिसांना दिली होती. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असेही त्यांनी ईमेलव्दारे कळविल्याचे सांगण्यात येत आहे.

    अतुल भातखळकर यांचे व्टिट
    दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काल याबाबत व्टिट केले होते. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावे उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला. या व्टिट मध्ये भातखळकर यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा केला होता. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.